Sunday, August 2, 2015

'श्रीमद्भवद्गीतारहस्य' अथवा ’कर्मयोगशास्त्र’ हा लेखक श्री.बाळ गंगाधर टिळक यांचा १९१५ साली प्रकाशित झालेला,भगवद्‌गीता या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परीक्षणात्मक टीकाग्रंथ आहे. हा ग्रंथ गीतारहस्य या नावानेच परिचित आहे.सदरील ग्रंथात गीतेचेअंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण समाविष्ट आहे. ह्या ग्रंथाच्या स्वरूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले.
अनुक्रमणिका
  
·          संदर्भ
ग्रंथाचे स्वरूप
मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे हा श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे.श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथात गीतेचा महाभारताशी असलेला सहसंबंध स्पष्ट करत अनुवाद केलेला आहे. त्याशिवाय अंतरंग परीक्षण म्हणजे गीतेचे अंतरंग काय सांगते त्याचे परीक्षण तर बहिरंगपरीक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, सध्या उपलब्ध असलेल्या गीतेचा काळ, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व बायबल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना ह्या आणि संबंधित इतरही विषयांवर विवेचन केले आहे.
ग्रंथरचना
१ विषयप्रवेश, २ कर्मजिज्ञासा, ३ कर्मयोगशास्त्र, ४ आधिभौतिक सुखवाद, ५ सुखदुःखविवेक, ६ आधिदैवत व क्षेत्रक्षेत्रविचार, ७ कापिल्य साख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार, ८ विश्वाची उभारणी व संहारणी, ९ अध्यात्म, १० कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, ११ संन्यास व कर्मयोग, १२ सिद्धावस्था व व्यवहार, १३ भक्तिमार्ग, १४ गीतध्यायसंगति, १५ उपसंहार, १६ परिशिष्टप्रकरण - गीतेचे बहिरंगपरिक्षण इत्यादी प्रकरणे १९१५च्या आवृत्तीत आहेत.
ग्रंथाची १९१५ची प्रथमावृत्ती ८५४ पानांची होती. ग्रंथ आणि परिशिष्टे मिळून साधारण १०००च्या वर पाने आहेत.



पूर्वाभ्यास, चिंतन आणि लेखन
लिहिण्यापूर्वी लोकमान्यांनी भगवद्गीतेवर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते. सरतेशेवटी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात कैदेत असताना टिळकांना विपुल समय आणि पुरेसे लेखनसाहित्य प्राप्त झाले, तेव्हाच हा ग्रंथ सिद्ध झाला.
सप्टेंबर ११, १९०८ ते जून ८, १९१४ हा काळ बाळ गंगाधर टिळक मंडाले येथील तुरुंगात होते. टिळकांनी १९१० या वर्षाच्या शेवटीशेवटी ‘गीतारहस्य’ लिहायला सुरुवात केली. श्लोकार्थविरहित ग्रंथ चार महिन्यांत लिहून झाला. २ मार्च १९१२१ च्या पत्रात तसा उल्लेख आहे. त्यांनी एप्रिलमध्ये श्लोकार्थही लिहून संपवला. ‘गीतारहस्य’चे लिखाण अशा प्रकारे १९११ मध्येच पूर्ण झाले असले, तरी त्याचे प्रत्यक्ष प्रकाशन मात्र टिळक तुरुंगातून सुटून आल्यानंतरच म्हणजे १९१५ मध्ये झाले.

No comments:

Post a Comment