मराठा मंदिरचे आद्य संस्थापक बाबासाहेब गावडे यांची जयंती 4 एप्रिल 2017 रोजी म.म. अ.के देसाई हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी
मराठा मंदिरचे आद्य संस्थापक बाबासाहेब गावडे यांची जयंती 4 एप्रिल 2017 रोजी म.म. अ.के देसाई हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली . प्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले नंतर आद्य संस्थापक बाबासाहेब गावडे व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मनियार सर यांनी पुष्पहार अर्पण केला.
त्यानंतर विज्ञानरंजनपरीक्षा ,बालिकादिनानिमित्त झालेली " सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिककार्य ", ही निबंध स्पर्धा ,हिंदी पंधरवडा साजरा करताना घेतलेल्या विविध स्पर्धा , स्काऊट मार्फत घेण्यात आलेली "खरी कमाई " ही स्पर्धा यांच्या बक्षिसांचे वितरण मुख्याध्यापक श्री. मनियार सर यांनी केले. त्यानंतर जेष्ठ शिक्षिका सौ.मंद्रूपकर यांनी शाळेला मिळालेली प्रशस्तीपत्रके प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मनियार सर यांच्याकडे सुपूर्त केली.
नंतर सौ. सावंत यांनी कर्मयोगी बाबासाहेब गावडे यांच्या जीवनपट मुलांना आपल्या ओघवत्या वक्तृत्वात सांगितला.शेवटी आपल्या अध्यक्षीयभाषणात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मनियार सर यांनी आपल्या विद्यार्थीदशेत त्यांना आद्य संस्थापक बाबासाहेब गावडे यांची झालेली प्रत्यक्ष भेट ही त्यांच्या जीवनाचा "TURNING POINT " कशी बनली हे सांगितले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री गार्डी यांनी केले.या कार्यक्रमासाठी म.म.अ.के देसाई हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार श्री गावखडकर यांनी मानले.
Thanks,Madam.
ReplyDeletecongratulations for making such blog